Mumbai Fire Brigade Budget: मुंबईत अग्निशमन दलाला मोठी बळकटी; अर्थसंकल्पात 119 कोटींची वाढ

हाय-राईज वाहनांपासून 650 AI-सक्षम CCTVपर्यंत व्यापक उपाययोजना; पूरजोखीम व्यवस्थापनालाही चालना
Mumbai Fire Brigade Budget
Mumbai Fire Brigade BudgetPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शहरांतील झोपडपट्टी, उतुंग इमारती, कार्पेरेट कार्यालये, हॉटेल आणि रुग्णालयांत आगीच्या दुर्घटनांचे सत्र सुरूच अअसून नागरिकांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात अग्निशम दल विभागाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी 230.90 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी फक्त 111.68 कोटी होती. यंदा मात्र त्यात119 कोटींची वाढ केली आहे. तसेच मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) नजीक नवीन अग्निशमन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

Mumbai Fire Brigade Budget
Maharashtra Government HR Reform: राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रक्रिया ‘ऑटोपायलट मोड’वर; एचआर सुधारणांची मोठी घोषणा

मुंबई सिटी सर्व्हिलन्स प्रकल्प :

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाअंतर्गत मुंबईत आणखी 650 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अत्याधुनिक व्हिडीओ ॲनेलिटिक्स प्रणाली बसविण्यात येणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित या उपक्रमामुळे प्रतिसाद क्षमता आणि आपत्कालीन परिस्थितीकरिता सुसज्जतेत वाढ होणार आहे. त्याबरोबरच बेकायदा बांधकामे व निष्कासनामधून निर्माणहोणारा कचरा टाकणे, कचरा कुंड्या भरून वाहणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अतिक्रमणे, पदपथांवरील अडथळे आदी नागरी समस्यांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी सोयीचे होणार आहे.

Mumbai Fire Brigade Budget
Pune Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी नव्याने अहवाल

शहरी पूर जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम

हवामान बदलामुळे वाढत्या तीव्रतेचा पाऊस आणि समुद्रपातळीत होणारी वाढ यामुळे शहराला पावसाळ्यात सखल भागांमध्ये पूरस्थितीचा धोका भेडसावत आहे. यासाठी ‌‘शहरी पूर जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम‌‘ तयार केला आहे. त्यामध्ये असंरचनात्मक

व संरचनात्मक उपाययोजनांचा समावेश आहे. यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून आर्थिक सहाय्यक मिळविण्याकरिता केंद्र शाससाच्या गृह मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकणाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

Mumbai Fire Brigade Budget
MSRTC Salary Arrears: एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढीची थकबाकी खात्यात जमा

नवीन वाहने / उपकरणे

उत्तुंग इमारतींमधील आग विझविण्यासाठी पाच हाय राईझ फायर फायटींग वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.

उत्तुंग इमारतींमध्ये अग्निशमन व विमोचन कार्यासाठी 32 मी. व 40 मी. उंचीचे प्रत्येकी 1 टर्न टेबल लॅडर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai Fire Brigade Budget
Mumbai Development Projects: मुंबईत 2.44 लाख कोटींची विकासकामे; कोस्टल रोड ते पाणी प्रकल्पांसाठी प्रचंड निधीची गरज

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 24 मी. उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म व हाय राईझ फायर फायटींग पंप्स असलेली 4 प्रथम प्रतिसादात्मक वाहने लवकरच कार्यान्वित होणार आहेत.

250 मी. उंचीपर्यंत पाणी पोहचवू शकतील अशी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 11 प्रथम प्रतिसादात्मक अग्निशमन वाहने दाखल होतील.

आपत्कालीन परिस्थितीकरिता प्रकाश व्यवस्था व उच्च दाबाचे पाण्याचे पंप असणारी 4 सहाय्यक वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news