Mumbai Development Projects: मुंबईत 2.44 लाख कोटींची विकासकामे; कोस्टल रोड ते पाणी प्रकल्पांसाठी प्रचंड निधीची गरज

पालिकेच्या मुदतठेवी मोडण्याची वेळ? 2027 जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार
Mumbai Development Projects
Mumbai Development ProjectsPudhari
Published on
Updated on

मुंबई महापालिकेकडून शहरात 2 लाख 44 हजार 552 कोटी रुपयाची विकास कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक 33 हजार 910 कोटी कोस्टल रोडसाठी लागणार आहेत. पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची आवश्यकता आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठीही सुमारे 22 हजार 916 कोटी रुपये खर्च आहे.

Mumbai Development Projects
BEST Budget Mumbai: 9 हजार कोटींच्या तुटीत बेस्ट; पालिकेकडून फक्त 1 हजार कोटींची मदत!

गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 15 हजार 738 कोटी खर्च येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडे उत्पन्नाची मोजकी साधने असल्यामुळे विविध बँकांमध्ये असलेल्या मुदतठेवी मोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

Mumbai Development Projects
Zero Prescription Policy Mumbai: ‘झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ कागदावरच? तीन मुदतवाढीनंतरही अंमलबजावणी रखडली

मुंबईत प्रायोगिक जनगणना

भारतीय जनगणना 2027 दोन टप्प्यात होणार. पहिल्या टप्प्यात घर यादीकरण व घरगणना (एप्रिल ते सप्टेंबर 2026 कोणताही एक आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (फेब्रुवारी 2027 मध्ये होणार) एम/पश्चिम विभागात प्रायोगिक तत्त्वावर जनगणना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. जनगणना 2027 ही पूर्णतः डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news