धर्म विचारून हल्ला करणाऱ्या झैब अन्सारीला पत्नीनेच बनवले कट्टरपंथी; ATS चा दावा, तर आरोपीला 'स्किझोफ्रेनिया' वकिलांचा युक्तिवाद

Mira Road Lone wolf attack case: सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणाऱ्या झैब जुबेर अन्सारीला त्याच्या पत्नीनेच कट्टरपंथी बनवले असावे, असा खळबळजनक संशय महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) न्यायालयात व्यक्त केला.
Mira Road Lone wolf attack case
Mira Road Lone wolf attack casefile photo
Published on
Updated on

Mira Road Lone wolf attack case:

मुंबई: मीरा रोड येथील नया नगर भागात धर्म विचारून दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला करणाऱ्या झैब जुबेर अन्सारी (वय ३१) याला त्याच्या अमेरिकन नागरिक असलेल्या पत्नीनेच कट्टरपंथी बनवले असावे, असा खळबळजनक संशय महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सोमवारी न्यायालयात व्यक्त केला. ठाण्यातील विशेष यूएपीए न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत ११ मे पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, आरोपी 'स्किझोफ्रेनिया' या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला असून, त्याच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली आहे.

'खिलाफत'ची शपथ, घरातून आक्षेपार्ह चिठ्ठ्या जप्त

सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयात सांगितले की, अन्सारी हा 'लोन वोल्फ' असून त्याला कोणाच्याही मदतीशिवाय कृती करण्याचे प्रशिक्षण मिळाले असावे. त्याच्या घरातून काही आक्षेपार्ह चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या चिठ्ठ्यांवर 'खिलाफत'ची शपथ, 'ISIS' आणि "तुमच्या मुशरिकनांना (मूर्तीपूजकांना) आता हिंदमध्ये खरा जिहाद दिसेल," अशा आशयाचे मजकूर लिहिलेले आहेत. या चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षर अन्सारीचेच आहे का, याची तपासणी एटीएस करत आहे, अशी माहिती मोरे यांनी न्यायालयाला दिली.

Mira Road Lone wolf attack case
Crime News | मैत्रीचा रक्तरंजित अंत! रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मित्रानेच रचला अपघाताचा बनाव; देवरुख पोलिसांकडून खुनाचा उलगडा

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

मोरे यांनी न्यायालयाला सांगितले की, हल्ला केल्यानंतर अन्सारीने घरी जाऊन आपल्या फोन आणि लॅपटॉपमधील डेटा नष्ट केला होता. "आम्ही फॉरेन्सिक लॅबकडून या उपकरणांच्या 'मिरर इमेज' मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा अभ्यास केल्यानंतर, त्याला कोणी कट्टरपंथी बनवले हे आम्हाला समजू शकेल. मात्र, प्राथमिक तपासात त्याच्या माजी पत्नीवर संशय आहे," असे मोरे यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन क्लास, विद्यार्थ्यांनाही कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न!

ATS च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अन्सारीच्या घरात सापडलेल्या कागदाच्या चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षर आणि त्याचे स्वतःचे हस्ताक्षर जुळते की नाही हे तपासण्यासाठी, त्यांना अन्सारीच्या हस्ताक्षराचे नमुने घेणे आवश्यक आहे. "तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत असे. त्याने आपल्या विद्यार्थ्यांनाही कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केला होता का, याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे," असे ते म्हणाले.

२०२३ मध्ये विवाह आणि कट्टरतावाद

अन्सारीचा २०२३ मध्ये विवाह झाला होता, मात्र २०२५ मध्ये त्याचा घटस्फोट झाला. त्याची पत्नी अफगाणी वंशाची अमेरिकन नागरिक होती. ती काही काळ भारतात वास्तव्यास होती, मात्र येथील वातावरणाशी जुळवून न घेता आल्याने तिने घटस्फोट घेतला आणि ती निघून गेली. तिनेच अन्सारीला कट्टरतावादाच्या मार्गावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असावी, असा एटीएसला दाट संशय आहे. अन्सारीचे कुटुंब सध्या अमेरिकेत स्थायिक आहे, तर अन्सारी व्हिसा संपल्यामुळे भारतात परतला होता.

आरोपीला 'स्किझोफ्रेनिया' हा मानसिक आजार, वकीलाचा दावा

दुसरीकडे, अन्सारीचे वकील वहाब खान यांनी न्यायालयात दावा केला की, अन्सारी हा 'स्किझोफ्रेनिया' या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. याच कारणामुळे तो लोकांमधे मिसळत नसे. अमेरिकेतील त्याच्या कुटुंबीयांनी फोनवरून या उपचारांची माहिती दिल्याचे खान यांनी सांगितले. न्यायालयाने या दाव्याची दखल घेत आरोपीची वैद्यकीय तपासणी आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

न्यायालयाने अन्सारीला पोलिसांच्या वागणुकीबद्दल विचारले असता, त्याने अमेरिकन उच्चारात उत्तर दिले की, त्याला हिंदी समजत नाही आणि ज्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या जात आहेत, त्याबद्दलही त्याला पूर्ण कल्पना नाही.

Mira Road Lone wolf attack case
BNSS Notice High Court | पोलिसांना अटकपूर्व नोटीस किंवा FIR प्रत व्हॉट्सॲप- ईमेलद्वारे पाठवण्याचा अधिकार नाही : हायकोर्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news