Mumbai-Pune Highway: मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर कंटेनर अडकल्याने प्रचंड वाहतूक कोंडी; सकाळपासून वाहनचालक त्रस्त|Video

Mumbai-Pune Highway Traffic Jam: जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर मोरवाडी येथे ग्रेड सेपरेटरखाली कंटेनर अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. पिंपरी–चिंचवड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली.
Mumbai-Pune Highway Traffic Jam
Mumbai-Pune Highway Traffic JamPudhari
Published on
Updated on

Mumbai-Pune Highway Traffic Jam: मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर आज सकाळी अचानक मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा एक अवजड कंटेनर मोरवाडी परिसरातील ग्रेड सेपरेटरखाली अडकला आणि काही क्षणांतच संपूर्ण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवासी, कर्मचारी आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थींना त्रास झाला. कंटेनरची उंची ग्रेड सेपरेटरपेक्षा जास्त असल्याने तो मध्येच अडकला. त्यामुळे सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही वेळातच पिंपरी–चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या.

हा कंटेनर एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असल्याची प्राथमिक माहिती असून चालकाला उंचीचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai-Pune Highway Traffic Jam
Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेच्या पहिल्याच सभेत 20 नामांतर प्रस्ताव; गदारोळाची शक्यता

घटनेची माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली. मात्र सकाळी कामावर निघालेल्या अनेक नागरिकांना तब्बल तासाभरापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

Mumbai-Pune Highway Traffic Jam
Orchestra Bar Licence: ऑर्केस्ट्रा बार चालकांना मुख्यमंत्र्यांचा इशारा; वारंवार नियमभंग केला तर परवाना रद्द केला जाणार

कंटेनर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली असून पोलिस आणि महामार्ग प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कंटेनर रिकामा करून तो बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत हा मार्ग पूर्णपणे मोकळा होण्यास वेळ लागणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे मोरवाडी, पिंपरी, चिंचवड आणि आसपासच्या भागात अंतर्गत रस्त्यांवरही मोठी गर्दी झाली. अनेक वाहनचालकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत परिस्थितीची माहिती दिली.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शक्य असल्यास जुना मुंबई–पुणे महामार्ग टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच अवजड वाहन चालकांनी ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल आणि अंडरपासची उंची तपासूनच प्रवास करावा, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील अवजड वाहनांच्या नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news