Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेच्या पहिल्याच सभेत 20 नामांतर प्रस्ताव; गदारोळाची शक्यता

23 फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा; रस्ते, पूल, चौकांच्या नामकरणावर निर्णय, 25 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation(File Photo)
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेची पहिली सर्वसाधारण मासिक सभा मंगळवार, 23 फेब्रुवारी 2026 रोजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या पहिल्याच सभेत तब्बल चार वर्षांपासून रखडलेले 27 पैकी 20 प्रस्ताव रस्ते, पूल, चौक आदींच्या नामांतरणाची घोषणा होणार आहे.

चार वर्षांनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली आणि भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली असून आता 25 फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून दुपारी सभागृहात स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी सभागृहाच्या पटलावर 27 प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. त्यापैकी किती प्रस्तावांना मंजुरी द्यायची हे महापौरांच्या अधिकारात आहे. मात्र पहिल्याच सभेत 20 प्रस्ताव नामांतराचे असून यावरून गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mumbai Municipal Corporation
Mumbai Missing Children 2025: मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; हरवलेल्या 99 टक्के मुलांचा शोध

निवडणुकीपूर्वी व नंतरच्या प्रस्तावांना मंजुरी

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने सुमारे 300 प्रस्तावांना मंजुरी दिली होती. तसेच निवडणुकीनंतरही सुमारे 50 प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या ठिकाणचे होणार नामांतर

वरळी येथील स्विमिंग पुलाचे ‌‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव‌’ असे नामकरण करण्यात येणार आहे. गोरेगाव पश्चिम, बांगूर नगर येथील जलनिधी सोसायटीजवळील रस्त्यास ‌‘भूदरमलजी धनुका रोड‌’ असे नाव देण्यात येईल. लालबाग येथील बॉम्बे गॅस लेनमधील मैदानाचे नामकरण ‌‘योगेश पाटील मनोरंजन मैदान‌’ असे करण्यात येणार आहे.

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला ‌‘छत्रपती शिवाजी महाराज फ्लायओव्हर‌’ असे नाव देण्यात येईल. काळा घोडा परिसरातील चौकाचे नामकरण ‌‘सायमन पेरेस चौक‌’ असे होणार आहे.

Mumbai Municipal Corporation
Mahavikas Aghadi Meeting: शरद पवार गटाची बैठकीत दांडी; विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण

अंधेरी पश्चिम, बांडिवली हिल येथील रस्त्यास ‌‘ॐ शिव शंकर मंदिर मार्ग‌’ असे नाव देण्यात येईल. तसेच गुलमोहर रोडजवळील रस्त्यास ‌‘गुलमोहर क्रॉस रोड 7 एक्स्टेंशन‌’ आणि त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यास ‌‘गुलमोहर क्रॉस रोड 7 कनेक्टिंग लेन‌’ अशी नावे देण्यात येणार आहेत.

अंधेरी पश्चिम, निर्मल हॉटेलजवळील रस्त्यास ‌‘संगीतकार बप्पी लहरी मार्ग‌’ असे नाव देण्यात येईल. मुलुंड कॉलनी, झुलेलाल मंदिराजवळील चौकाचे नामकरण ‌‘श्री झुलेलाल भगवान चौक‌’ असे करण्यात येणार आहे. मालाड पश्चिम येथील जलतरण तलावाला ‌‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी

Mumbai Municipal Corporation
Maharashtra Opposition Leader Appointment: विरोधी पक्षनेता नेमला नाही तर कामकाजावर बहिष्कार!

जलतरण तलाव‌’ असे नाव देण्यात येईल. चेंबूर, संडू गार्डनजवळील रस्त्यास ‌‘आचार्य श्री महाश्रवण रोड क्रमांक 17‌’ असे नाव देण्यात येणार आहे.

मुलुंड पश्चिम, हिमांशू रॉय व जकरिया रोडवरील चौकाचे नामकरण ‌‘आचार्य श्री महाप्रज्ञ चौक‌’ असे करण्यात येईल. पवई येथील जंक्शनला ‌‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक‌’ असे नाव देण्यात येणार आहे.

वरळी येथील डॉ. जी. एम. भोसले मार्ग व हुतात्मा रमेश देवरुखकर मार्गाजवळील जंक्शनला ‌‘रामचंद्र म्हामुंकर मार्ग‌’ असे नाव देण्यात येईल. परळ, आर. एम. भट शाळेजवळील रस्त्यास ‌‘परळची देवी मार्ग‌’ आणि जेरबाई वाडिया मार्गाजवळील रस्त्यास ‌‘वसंतराव विष्णू चोकेकर मार्ग‌’ असे नामकरण करण्यात येईल.

Mumbai Municipal Corporation
Maharashtra Budget Session 2026: कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, महामार्ग वाहतूक कोंडी गाजणार!

अंधेरी पश्चिम, दत्ताजी साळवीजवळील चौकाचे ‌‘शेठ के. डी. पोद्दार चौक‌’ तसेच कुर्ला पूर्व येथील चौकाचे ‌‘गौतम साबळे चौक‌’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर एकूण 27 प्रस्ताव मांडले असून त्यापैकी तब्बल 20 प्रस्ताव हे शहरातील चौक, रस्ते आणि पुलांच्या नामकरण व नामांतरासंदर्भात आहेत, तर उर्वरित प्रस्तावांमध्ये तीन प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीबाबत आहेत, तर एक प्रस्ताव पदपथावरील गटई कामगारांना स्टॉल देण्यासंदर्भातील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news