Maharashtra MLC elections: विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; अमरावती, पुणे, नागपूरसह ५ जागांच्या निवडणुका जाहीर

राज्यात लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकांची घोषणा अखेर आज झाली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Maharashtra Legislative Council Election
Maharashtra Legislative Council ElectionPudhari
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council elections:

मुंबई: राज्यात लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शिक्षक व पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यातील ५ मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडेल, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

Maharashtra Legislative Council Election
VOTER LIST CONTROVERSY : लालकृष्ण आडवाणी, जयशंकर यांच्यासह अनेकांना एसआयआरच्या नोटिसा

'तृणमूल'चे नाव गोठवण्याविरोधात ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात

तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत फुटीनंतर पक्षाचे नाव आणि मूळ निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे मान्य केले.

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा तातडीने उल्लेख केला. पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झालेली असताना अचानक चिन्ह गोठवण्याच्या आयोगाच्या भूमिकेवर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या याचिकेत निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 'पक्षाची ओळख हिरावून घेणे म्हणजे आईपासून मूल हिरावण्यासारखे आहे,' असे म्हणत त्यांनी हा दिवस लोकशाहीच्या इतिहासातील 'काळा दिवस' असल्याचे सांगितले. ही तात्पुरती तडजोड आपण मान्य करणार नसून मूळ ओळख आणि चिन्हासाठी कायदेशीर, राजकीय व लोकशाही मार्गाने शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Legislative Council Election
Sonia Gandhi Voter List Row: वोटर लिस्ट प्रकरणी सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ...? खालच्या कोर्टाचा निकाल केला रद्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news