Lalbaug Parel Viral Video: ‘तुमच्यामुळे आम्हाला घराबाहेर पडता येत नाही’; लालबाग-परळमधील तरुणीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Lalbaug Parel Viral Video: लालबाग-परळ परिसरातील एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गणपती आगमनाच्या गर्दीत महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा तिने मांडला आहे.
Lalbaug Parel Viral Video
Lalbaug Parel Viral VideoPudhari
Published on
Updated on

Lalbaug Parel Viral Video: मुंबईतील लालबाग-परळ परिसरातील एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठी गर्दी होत असताना तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना जबाबदारीने वागावे, अशी विनंती या तरुणीने केली आहे.

या व्हिडिओमध्ये तरुणी सांगते की, ती लालबाग-परळ परिसरात राहते. गणपती आगमनाच्या काळात घराबाहेर मोठी गर्दी असते. परिसरात मोठ्या संख्येने तरुण जमा होत असल्याने तिला घरातून खाली जाण्यासही अडचणी येत असल्याचे ती सांगते.

‘आम्हा मुलींना सुरक्षित वाटत नाही’

व्हिडिओमध्ये तरुणीने परिसरात येणाऱ्या तरुणांना त्यांच्या वर्तनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. “तुम्ही लालबाग-परळला गणपतीत येता, तेव्हा काय करता याकडे लक्ष द्या. तुमच्यामुळे आम्हाला घराच्या खाली येताही येत नाही. आम्हा मुलींना सुरक्षित वाटत नाही,” अशा आशयाची प्रतिक्रिया तिने दिली आहे.

Lalbaug Parel Viral Video
Mumbai University APAAR ID: हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्यांना आता अपार आयडी बंधनकारक; विद्यार्थ्यांची धावपळ वाढणार

गणपती आगमनाच्या वेळी मोठ्या संख्येने तरुण परिसरात येतात. त्यातील काही जणांकडून केले जाणारे गैरवर्तन आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे प्रकार यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याचा मुद्दा तिने या व्हिडिओतून मांडला आहे.

व्हिडिओ नेमका कधीचा?

या व्हिडिओमध्ये गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर तरुणीने आपली व्यथा मांडली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची सध्या अधिकृत माहिती उपलब्ध नाही. व्हिडिओ जुना आहे की यंदाच्या गणपती आगमनाच्या काळातील आहे, याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Lalbaug Parel Viral Video
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; 'एक्स' पोस्ट करत कारणही सांगितलं

सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागण्याचा मेसेज

गणपती उत्सव आणि आगमन मिरवणुकीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येतात. अशा वेळी उत्साह आणि जल्लोषासोबत इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे.

विशेषतः महिलांना आणि स्थानिक रहिवाशांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी तरुणांनी गैरवर्तन टाळावे, गर्दीत शिस्त पाळावी आणि परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असा मेसेज या व्हिडिओतून दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news