Mumbai University APAAR ID: हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्यांना आता अपार आयडी बंधनकारक; विद्यार्थ्यांची धावपळ वाढणार

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयामुळे परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांची धावपळ वाढणार
Mumbai University APAAR ID
Mumbai University APAAR IDPudhari
Published on
Updated on

मुंबई: आगामी परीक्षांचे हॉलतिकीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपार आयडीशिवाय विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तयार होणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.अपार आयडी, एबीसी आयडी जोडणी किंवा आधार प्रमाणीकरणात अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल मागोवा ठेवण्यासाठी ‘अपार’ (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन) आयडी सुरू करण्यात आला आहे.

Mumbai University APAAR ID
Mumbai Hospitals Wastewater Treatment: पालिका रुग्णालयांच्या आवारात सांडपाणी, कचरा प्रक्रिया प्रकल्प

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी, क्रेडिट्स आणि विविध शैक्षणिक प्रक्रियांना डिजिटल स्वरूपात जोडण्यासाठी या आयडीचा वापर केला जाणार आहे. केंद्र शासनाने विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील विविध यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने आगामी परीक्षांच्या हॉलतिकीटासाठी अपार आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे अपार आयडी नसेल तर हॉलतिकीटच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Mumbai University APAAR ID
Mumbai High Court Clerk Exam: मुंबई हायकोर्ट लिपिक भरतीच्या टायपिंग टेस्टमध्ये गोंधळ

परीक्षा तोंडावर असताना अपार आयडी तयार करताना तांत्रिक अडचणी, आधार प्रमाणीकरणातील त्रुटी किंवा कागदपत्रांमधील विसंगती असल्यास विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.यामुळे आताच आयडी काढा, असे आवाहन केले आहे.

महाविद्यालयांवरही जबाबदारी

अपार आयडीची प्रक्रिया अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या शिबिराची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्याची जबाबदारी संलग्न महाविद्यालये व संस्थांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना याबाबत तातडीने माहिती देण्याच्या सूचना विद्यापीठाने केल्या आहेत.

शेवटच्या क्षणी धावपळ नको

हॉलतिकीटासाठी अपार आयडी बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रक्रिया रखडवू नये, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. अपार आयडी नसल्यास हॉलतिकीट तयार होणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी व अडचण असल्यास १९ व २० ऑगस्टच्या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिरास येताना आधार कार्ड व समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

१९ आणि २० ऑगस्टला विशेष शिबीर

विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या वतीने १९ आणि २० ऑगस्ट २०२६ रोजी विशेष आधार सुविधा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कलिना कॅम्पसमधील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे होणार आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या समन्वयाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात अपार आयडी तयार करणे, अपार आयडी, एबीसी आयडी जोडणे, आधार प्रमाणीकरण, आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकातील तफावत, नाव, जन्मतारखेतील विसंगती तसेच आधारशी संबंधित इतर अडचणी दूर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news