Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; 'एक्स' पोस्ट करत कारणही सांगितलं

महाराष्ट्रातील सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबाबत चर्चा

Devendra Fadnavis Narendra Modi meeting
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Devendra Fadnavis X
Published on
Updated on

Devendra Fadnavis Narendra Modi meeting : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची सद्यस्थिती आणि प्रगती याबद्दल पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.

पंतप्रधान मोदींना दिली विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्या 'X' हँडलवरून या भेटीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली. तसेच केंद्र सरकारच्या समन्वयातून राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य आणि पाठिंब्याची मागणी केली."


Devendra Fadnavis Narendra Modi meeting
E10 Petrol : "जुन्या गाड्यांसाठी E10 पेट्रोल पुन्हा सुरू करा"; इंधनातील इथेनॉलवर मुख्य आर्थिक सल्लागार नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Narendra Modi meeting
Ukraine Russia war : युक्रेनचा रशियाच्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यावर हल्ला; ८०० हून अधिक ड्रोन डागले, ६ जणांचा मृत्यू

PM मोदींचे विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन

पंतप्रधान मोदी यांची भेट ही नेहमीच एक नवी ऊर्जा देणारी असते. त्यांचे विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा, यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे, असेही फडणवीस यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.


Devendra Fadnavis Narendra Modi meeting
Shehzad Poonawalla : "लाडक्या पक्षाला भावूक निरोप.."; शेहजाद पूनावालांनी दिला भाजपच्‍या सर्व पदांचा पुन्‍हा एकदा राजीनामा

काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली होती मोदींची भेट

काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील खासदारांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news