

मुंबई: राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एक कथित व्हिडीओप्रकरणी ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवरून त्याच्या भावाविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये नोकरी लावण्याची मागणी केल्याचा अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
विशेष म्हणजे, हा व्हिडीओ मूळ स्वरूपात नसून तो एडिट करून किंवा त्यात छेडछाड करून व्हायरल करण्यात आल्याचा दावाही केला आहे. कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 आणि 351(1) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या कलमांनुसार, कोणाच्या तरी गोपनीयतेचा भंग करणे, बदनामीकारक मजकूर पसरवणे आणि धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो. या प्रकरणाचा तपास आता कफ परेड पोलिसांकडून केला जात आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृथीयपंथीय व्यक्तीसोबतचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.