Ashwini Bhide Mumbai Municipal Commissioner: अश्विनी भिडेंकडे दुहेरी जबाबदारी; महापालिका आयुक्तपदासोबत मेट्रोची जबाबदारीही कायम

दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव
Ashwini Bhide Mumbai Municipal Commissioner
Ashwini Bhide Mumbai Municipal CommissionerPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

भिडे यांच्याकडील मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही कायम ठेवण्यात आला आहे. 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Ashwini Bhide Mumbai Municipal Commissioner
Ready Reckoner Rates Maharashtra 2026: रेडीरेकनर दर जैसे थे! राज्य सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा

भिडे यांच्या मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्तीनंतर त्यांच्या जागी लोकेश चंद्रा यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे, तर कृषी आणि पदुम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल यांची मृद आणि जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे, तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांची मंत्रालयात कृषी आणि पदुम विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Ashwini Bhide Mumbai Municipal Commissioner
Eknath Shinde Operation Tiger: शरद पवारांचे खासदार फोडण्यास 'टायगर'ला भाजपची परवानगी नाही

लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर माणिक गुरसाल यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियक्ती देण्यात आली आहे. राज्य कर उपायुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी बदली केली आहे. पुणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची 20 वर्षांत 24 वी बदली

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांतील मुंढे यांची ही 24 वी बदली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागात बदली झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news