

Eknath Shinde On Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या सुप्त स्पर्धेबाबत आज स्पष्टच बोलले आहेत. त्यांनी फडणवीस यांच्यासोबत कोल्ड वॉर असल्याचं नाकारलं. हे कोल्ड वॉर माध्यमांनी तयार केलं आहे यात काही सत्यता नाही असा दावा शिंदे यांनी केला.
याचबरोबर त्यांनी फडणवीस यांच्याबाबतच्या नात्याबाबत देखील एक मोठा खुलासा केला. शिंदे हे आज तकच्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी माझ्या आणि फडणवीस यांच्या नात्यात कोणताही दुरावा नसल्याचं सांगितलं. मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी मी फडणवीसांना उपमुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्रीच समजत होतो. आम्ही २४ तास काम करणारे नेते असून राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे असेही शिंदे म्हणाले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईला सुपफास्ट करण्याचा आमचा अजेंडा आहे. महाराष्ट्राला आम्ही फास्ट करतच आहोत. कामं करायला थोडा वेळ द्या, आम्ही खड्यांची समास्या सोडवत आहोत. पुढच्या एका वर्षात मुंबई खड्डेमुक्त होईल, ट्रॅफिक देखील कमी होईल असा दावा केला.
शिंदे यांनी २०२७ पर्यंत संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त व्हावी यासाठी सतत काम करत आहोत. या कामाला वेळ लागतोय कारण आम्ही खूप काळ ट्रॅफिक थांबवून धरू शकत नाहीत. यामुळे शेकडो प्रवासी प्रभावित होणार आहेत.' त्याच जोडीला मेट्रो नेटवर्क पूर्ण झाल्यावर लोकांना मोठा दिलासा मिळेल. शिंदेंनी सांगितले की ते जे वचन देतात ते पूर्ण करतात.'
मुंबईच्या निवडणुकीबद्दल एकनाथ शिंदेंनी सांगितले की, 'तुम्ही विचारधारेच्या विरोधात जाऊन सत्ता आणि विजय मिळवू शकत नाही. स्थानिक निवडणुकीत कार्यकर्ता शिफारस करत अशतो. त्या आधारेच युती होत असते. या निवडणुकांना विधानसभेच्या निवडणुकीशी जोडून पाहू नये. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. दुसऱ्या निवडणुका मोठ्या असतात. मात्र इथं कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असते. आम्हीही म्हणतो लढा.
शिंदेनी हे वक्तव्य अंबरनाथ आणि अकोट मधील भाजपच्या आणि काँग्रेस अन् AIMIM सोबतच्या अभद्र युतीच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. मात्र त्यांनी आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शांवर चालतो. आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करत नाही असं म्हणतं आपली भूमिका स्पष्ट केली.
शिंदेंनी अंबरनाथ मधील आघाडीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोललो असून त्यांना ही घटना आपल्या विचारधारेच्या विरोधात असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलं देखील.
शिंदे यांनी मुंबईत सर्व समाजाचे लोक राहतात ते मुंबईकर नाहीत का? ते आपले वैरी आहेत का असा सवाल देखील उपस्थित केला. त्यांनी विरोधक प्रत्येक गोष्टीचा विरोध करत अशतात त्यांच्याकडे मुद्देच नाहीयेत असं देखील सांगितलं.