

मुंबई : विश्वकुमार धुरी
करीरोड येथील स्वातंत्र्य सैनिक सखाराम बाळाजी पवार मार्गावरील स्थानिक नागरिक चार महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्ते कामामुळे त्रस्त आहेत. काँक्रीटीकरणासाठी रस्ता खोदून ठेवला, आता डांबरीकरण करणे सुरू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
जानेवारी महिन्यात या कामासाठी कार्याध्येश काढण्यात येत महानगरपालिका निवडणुकीआधी काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्यक्षात डांबरीकरण सुरू केले. याबाबत कोणताही खुलासा करणारे फलक वा पत्रक पालिकेकडून काढलेले नाही. युटिलिटी बदलण्याच्या कामामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असताना, चार फूट खड्याच्या जागी दोन फूट खड्डा खोदून 33 केव्हीची लाईन टाकण्यात येत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी साफल्य इमारतीतील रहिवासी प्रथमेश नेवरेकर यांनी बेस्टच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
बेस्ट मार्फत हाय व्होल्टेज केबल टाकण्याचे काम कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करण्यात आली. साफल्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर हे काम झाल्याने रहिवाशांचा संताप अनावर झाला आहे. या भागातील पिंपळेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र रस्ते कामामुळे पडलेले खडे, डेब्रिज व राडारोड्यामुळे यंदाचा उत्सव कसा पार पडेल याबाबत शिवभक्त व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जेवढ्या भागात डांबरीकरण झाले, त्याचा दर्जाही सुमार असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. हे काम रहिवाशी हिताचे आहे की ठेकेदारांच्या हिताचे, याबाबत स्पष्टता करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काम कोणती यंत्रणा हाताळत आहे, बेस्ट की टाटा ?
हाय पावर (33 केव्ही) सप्लाय लाईन कोणासाठी
आहे?
विद्युत वाहिनी दोन ते तीन फुटावर का टाकली जात आहे? भविष्यात दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?
पावसाळी पर्जन्य वाहिन्या तोडण्यात आल्या असून माती टाकून बुजवण्यात आले याची जबाबदारी कोण घेणार?
लोलेवल लाईन एरिया पावसाळ्यात पाण्याखाली जात दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असेल?
एवढा हाय व्होल्टेज लाईन पाण्याच्या पाईप यांना विळखा का घालून जात आहेत. हे कोणाच्या दर्शनात येत आहे की नाही?
कॉन्टॅक्टर मनाप्रमाणे जिथे हवे तिथे खड्डे खनत आहेत. सर्व लाईन जोडून वर माती टाकून ती बुजवतायेत याची नोंद कोण घेणार?