Mumbai AQI Today: तापमानात वाढ होऊनही मुंबईची हवा गुणवत्ता बिघडलेलीच!

हिरानंदानी, चेंबूर, वडाळा, विलेपार्ले परिसरात प्रदूषण वाढले; नवी मुंबईत एक्यूआय 186
Mumbai AQI Today
Mumbai AQI TodayPudhari
Published on
Updated on

मुंबई : तापमानात वाढ झाली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवा गुणवत्ता (एक्यूआय) बिघडलेलीच आहे. बुधवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 166 इतका नोंदवला गेला.

Mumbai AQI Today
GT Hospital MRI service: जीटी रुग्णालयातील कोट्यवधींची एमआरआय सेवा 8 महिन्यांपासून ठप्प; रुग्णांना खासगी केंद्रांचा आधार

मुंबईवर प्रदूषणाचे ढग कायम आहेत. प्रमुख स्टेशनांचा आढावा घेतल्यास हिरानंदानी गार्डन (191), चेंबूर-पश्चिम (184) भक्ती पार्क - वडाळा (185) तसेच मराठा कॉलनी - विलेपार्ले (179) या भागात वाढते प्रदूषण आहे. गेले काही दिवस मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण आणि धुके जाणवत आहे.

Mumbai AQI Today
Mumbai Climate Week 2026: 17-19 फेब्रुवारीला ‘मुंबई क्लायमेट वीक 2026’; हवामान नेतृत्वासाठी ग्लोबल साऊथला नवा मंच

दरम्यान , बुधवारी नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकही सरासरी 186 पर्यंत नोदवला गेला आहे. प्रदूषणाची पातळी वाढत असताना शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे शहराचा वायू प्रदूषणाशी सुरू असलेला संघर्ष अधोरेखित झाला आहे. 151 ते 200 मधील एक्यूआय हा आरोग्यासाठी घातक हवेची कॅटेगरी आहे.

Mumbai AQI Today
Mumbai Mayor Action: बांग्लादेशी फेरीवाले मुंबईतून हद्दपार करू

वाढत्या प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने श्वसनाच्या आजारांनी डोके वर काढले आहे. विशेषतः मुले, वृद्ध आणि फुफ्फुसांचे आजार असलेल्या लोकांना अशा वातावरणाचा खूप त्रास होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news