BJP Mayor of Mumbai: भाजपचा मुंबई महापौर पहिला की दुसरा ?

1982 मधील प्रभाकर पै यांच्या निवडीवरून तांत्रिक वाद; भाजपच्या तिकिटावर निवड झालेल्या रितू तावडेच ‘पहिल्या’ महापौर असल्याचा दावा
BJP Mayor of Mumbai
BJP Mayor of MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेत यंदा भाजपचा महापौर निवडला गेला तो भाजपचा पहिला महापौर ठरणार की दुसरा, अशी नवीच चर्चा आहे. 1982 साली मुंबईचे महापौर झालेले प्रभाकर पै हे भाजपचे होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, पै यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस, जनता पार्टी आणि पुढे भाजप असा झाला. त्यामुळे लौकिकार्थाने यंदा प्रथमच भाजपचा महापौर विराजमान झाला.

BJP Mayor of Mumbai
Women Mayors of Mumbai: 138 वर्षांचा इतिहास; मुंबईला लाभल्या केवळ 8 महिला महापौर; भाजपच्या रितू तावडे ठरल्या अष्टकातील आठव्या महिला महापौर

डॉ. प्रभाकर पै हे 1982 साली मुंबईचे महापौर झाले, ते भाजपचे निष्ठावान होते, असे सांगत ते भाजपचे मुंबईतील भाजपचे पहिले महापौर ठरतात, असा दावा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी समाजमाध्यमातून केला. त्यामुळे आता बिनविरोध निवड झालेल्या रितू तावडे भाजपच्या दुसऱ्या महापौर ठरतात. महापौर कार्यालयातील तत्कालीन अधिकारी प्रकाश परांजपे शहापूरकर यांच्या आठवणीची साक्ष यासंदर्भात दिली जात आहे. मात्र, हा दावा तांत्रिक असून रितू तावडे याच भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत, अशी भूमिका 80 च्या दशकात भाजपमध्ये कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने मांडली.

BJP Mayor of Mumbai
Worli SRA stay: वरळीतील संक्रमण शिबिराच्या बांधकामाला उच्च न्यायालयाची तात्काळ स्थगिती

महापालिकेत 1978 साली निवडून आलेले नगरसेवक 1984 पर्यंत कार्यरत होते. पुढे जनता पार्टीचा प्रयोग झाला ज्यात तत्कालीन जनसंघही सहभागी होता. शिवाय, भाजपची स्थापना 1980 साली झाली. विशेष म्हणजे प्रभाकर पै हे 1968 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1978 सालच्या निवडणुकीतही ते नगरसेवक बनले. मात्र, तेव्हा जनता पार्टी होती.

BJP Mayor of Mumbai
Mumbai AQI Today: तापमानात वाढ होऊनही मुंबईची हवा गुणवत्ता बिघडलेलीच!

1980 साली भाजपची स्थापना झाल्यानंतर तेही भाजपमध्ये होते. त्यामुळे 1982 साली राजकीय अस्थिरता, तडजोडीत पै हे महापौर बनले असले तरी भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले होते असे म्हणता येणार नाही. त्यामुळेच भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या रितू तावडे भाजपच्या मुंबईच्या पहिल्या महापौर ठरतात, असा दावा या ज्येष्ठ नेत्याने केला. हा नेता 1978 साली जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. शिवाय, पुढच्या काळात ते भाजपचे आमदारही बनले होते. त्यामुळे त्यांचा संदर्भ महत्वाचा ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news