नवीन वर्षात सिडको मेट्रो रेल्वे धावणार, अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत मेट्रो रेल्वे

सिडको मेट्रो रेल्वे
सिडको मेट्रो रेल्वे
Published on
Updated on

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

सिडकोचा नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता केवळ सीएमआरएस म्हणजे मेट्रो रेल्वे सुरक्षाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत नवी मुंबई मेट्रो रेल्वे अडकली आहे. ही अखेरची परवानगी मिळावी म्हणून सिडकोने मेट्रो रेल्वे सुरक्षा विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. ही परवानगी मिळताच रेल्वे मंत्रालयाच्या आदेशाने नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मेट्रो रेल्वे रुळावरून धावेल, अशी अपेक्षा सिडकोला आहे. यामुळे नवी मुंबईसारख्या क्वीन नेकलेस सिटीत आणखी भर पडून प्रवासी वाहतूक मार्ग सुखकर होईल.

बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 करीता रिसर्च डिझाईन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र 20 ऑक्टोबर 2021 रोजी देण्यात आले. मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्याची मंजुरी या प्रमाणपत्राद्वारे सिडकोला मिळाली आहे. यामुळे लवकरच या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो मार्ग क्र. 1 वर घेण्यात येणारी ऑसिलेशन चाचणी यशस्वी ठरली आहे.

सिडकोकडून नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग साकारण्यात येत आहेत. यातील बेलापूर ते पेंधर हा मार्ग क्र. 1 एकूण 11 किमी. लांबीचा आहे.

या मार्गावर तळोजा येथे मेट्रोचे आगार आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत असणाऱ्या आरडीएसओ यांच्याकडून देशातील विविध रेल्वे प्रणालींमध्ये प्रमाणीकरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी असते. आरडीएसओ यांच्याकडून सदर मार्ग क्र. 1 वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या 5.14 कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इनर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी 28 ऑगस्ट 2021 पासून घेण्यास सुरुवात झाली.

प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्यादृष्टीने चाचपणी म्हणून ऑसिलेशन चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते. या दरम्यान वेगवेगळ्या वजनाचा भार वाहून नेण्याची मेट्रोची क्षमता आणि इमर्जन्सी ब्रेक यांची चाचणी घेण्यात आली. तसेच सिडकोकडून रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, विद्युत पुरवठा, मार्गिका इ. मेट्रोतील प्रणालींशी संबंधित कागदपत्रे, चाचणी प्रमाणपत्रे आरडीएसओला सादर करण्यात येऊन, कागदपत्रांची आरडीएसओकडून पडताळणी करण्यात आली.

ऑसिलेशन चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मार्ग क्र. 1 वर कमाल वेगाने मेट्रोचे परिचालन करण्याकरिता आरडीएसओकडून वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यानंतर लवकरच आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून परीक्षण करण्यात येईल व तद्नंतर रेल्वे मंडळाची मंजुरी प्राप्त करून मार्ग क्र. 1 वर पेंधर ते सेंट्रल पार्क स्थानकांदरम्यान प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल.

येत्या नवीन वर्षात सिडकोची मेट्रो रुळावरून धावले अशी अपेक्षा सिडकोला आहे. सिडकोकडून मेट्रोची पूर्ण तयारी झाली आहे. यामुळे नवी मुंबई सारख्या क्वीन नेकलेस सिटीत आणखी भर पडून प्रवासी वाहतूक मार्ग सुखकर होईल.

आरडीएसओकडून या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्यासंदर्भातील अंतरिम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. आता प्रवासी वाहतूक कार्यान्वित करण्यासाठी सीएमआरएस मंजुरीची प्रतीक्षा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मेट्रो रेल्वे रुळावरून धावले अशी अपेक्षा आहे. – डॉ. संजय मुखर्जी, सिडको एमडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news