Gangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारीची तपास संस्थांकडून कसून चौकशी | पुढारी

Gangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारीची तपास संस्थांकडून कसून चौकशी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

फिलिपाईन्सवरून भारतात आणण्यात आलेला कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी ( Gangster Suresh Pujari ) याची आयबीसह इतर तपास संस्थांनी कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुजारी याच्याविरोधात खंडणीचे असंख्य गुन्हे दाखल आहेत. एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा सुरेश पुजारी हा खास हस्तक होता. मात्र नंतर त्याने त्याची साथ सोडून स्वतःची टोळी तयार केली होती.

मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली तसेच इतर उपनगरात आणि कर्नाटकात सुरेशच्या विरोधात कित्येक गुन्हे दाखल आहेत. 15 ऑक्टोबर रोजी सुरेशला इंटरपोलने फिलिपाईन्समध्ये अटक केली होती. त्यानंतर दीड महिन्याने त्याला भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी रात्री सुरेशला दिल्ली विमानतळावर आणण्यात आले.

Gangster Suresh Pujari : आठ वेगवेगळ्या नावाने पासपोर्ट

सुरेश पुजारीला भारतात आणल्‍यानंतर आयबीसह अन्‍य तपास संस्‍थांनी त्‍याची कसून चौकशी केली. आठ वेगवेगळ्या नावाने सुरेश पुजारी याने पासपोर्ट बनविलेला होता. त्याच्या आधारे तपास संस्थांना चकमा देत तो जगभरात प्रवास करीत असे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी सुरेश पुजारीच्या विरोधात क्रमश 2017 आणि 2018 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. गेल्या 15 वर्षांपासून सुरेश पुजारी फरार होता. रवी पुजारीपासून त्याने 2007 साली फारकत घेतली होती. त्यानंतर तो विदेशात पळाला होता.

हेही वाचलं का? 

 

Back to top button