BMC Property Tax: मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई; जप्ती व लिलावाच्या नोटिसा बजावल्या

140 कोटींपर्यंत थकबाकी; कर न भरल्यास मालमत्ता व चीजवस्तूंचा लिलाव करण्याचा इशारा
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

मुंबई : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार कलम 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल. जप्त चीज वस्तूतूनही कर वसूल झाला नाही तर, कलम 206 अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे महापालिकेने नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Property Tax
Navi Mumbai Standing Committee: नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक 17 फेब्रुवारीला; भाजपचे 10, शिवसेनेचे 6 सदस्य निश्चित

मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून 90 दिवसांच्या bआत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करत असतात.

Property Tax
Veer Savarkar Flyover: गोरेगावचा वीर सावरकर उड्डाणपूल वाचणार; पाडकाम रद्द, मोनोपाईल तंत्रज्ञानाने पुनर्बांधणी

तरीही मालमत्ता कर न भरल्यास डिमांड लेटर पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास 21 दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.

Property Tax
Vile Parle Building Fire: विलेपार्लेतील 13 मजली इमारतीत भीषण आग; एका महिलेचा मृत्यू, एक जखमी

9 फेब्रुवारी रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या मालमत्ताधारकांची यादी

मेसर्स रघुवंशी मील्स लि. (जी दक्षिण विभाग) - 140 कोटी 61 लाख 68,630 रु.

मेसर्स राजहंस असोसिएट्स (एस विभाग) - 47 कोटी 02 लाख 99,687 रुपये

मेसर्स आशापदारा डेव्हलपर्स (एच पूर्व विभाग) - 44 कोटी 87 लाख 80,005 रुपये

मेसर्स सुमेर बिल्टकॉर्प प्रा. लि. (ई विभाग) - 39 कोटी 30 लाख 47 हजार 491 रुपये

समीर एन भोजवानी (के पश्चिम विभाग) - 31 कोटी 73 लाख 23 हजार 416 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 29 कोटी 12 लाख 21 हजार 635 रुपये

मेसर्स आमीर पार्कस्‌‍ ॲण्ड ॲम्युझमेंट प्रायव्हेट लिमिटेड (पी दक्षिण विभाग) - 27 कोटी 79 लाख 55 हजार 039 रुपये

Property Tax
Fake Caste Certificate: सायन वैद्यकीय महाविद्यालयात बनावट जात प्रमाणपत्राचा पर्दाफाश; एमबीबीएस प्रवेश रद्द

मेसर्स डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - 22 कोटी 42 लाख 60 हजार 063 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 22 कोटी 40 लाख 48 हजार 485 रुपये

मेसर्स एस.डी. कॉर्पोरेशन (आर दक्षिण विभाग) - 21 कोटी 43 लाख 42,109 रुपये

श्री. ए.आर. जाफर (डी विभाग) - 21 कोटी 3 लाख 36 हजार 752 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 56 लाख 33 हजार 841 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 56 लाख 30,421 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 55 लाख 62 हजार 036 रुपये

Property Tax
Bhiwandi Honeytrap Case: भिवंडीत बांधकाम व्यावसायिक हनीट्रॅपमध्ये अडकला; लाखोंचा ऐवज उकळून आरोपी फरार

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 54 लाख 18 हजार 426 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 54 लाख 04 हजार 749 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 53 लाख 46 हजार 621 रुपये

मेसर्स गॅलेक्सी कॉर्पोरेशन 10 प्लॅनेट (एच पश्चिम विभाग) - 20 कोटी 22 लाख 82 हजार 662 रुपये

मेसर्स डीबीएस रिएॲल्टी (एल विभाग) - 19 कोटी 10 लाख 41 हजार 320 रुपये

मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 18 कोटी 67 लाख 69 हजार 402 रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news