Bhiwandi Honeytrap Case: भिवंडीत बांधकाम व्यावसायिक हनीट्रॅपमध्ये अडकला; लाखोंचा ऐवज उकळून आरोपी फरार

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत गुजरातमधील कुटुंबाकडून आर्थिक लूट; दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
Bhiwandi Honeytrap Case
Bhiwandi Honeytrap CasePudhari
Published on
Updated on

भिवंडी : गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यात राहणाऱ्या कुटुंबाने भिवंडीतील एका बांधकाम विकासकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा करून टोपी लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bhiwandi Honeytrap Case
Maharashtra Zilla Parishad election: जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत महायुतीचा झंझावात; भाजपचे ग्रामीण महाराष्ट्रावर निर्विवाद वर्चस्व

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय असलेला तक्रारदार बांधकाम व्यवसायिक आहे. त्यातच तक्रारदार यांना 26 एप्रिल 2024 ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भिवंडीतील एका लॉजवर तिन्ही आरोपींनी हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याने तक्रारदार यांचे व्हीडिओ काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी महिलेने वेळोवेळी त्याच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, आणि घर घेण्यासाठी पैश्यांची मागणी केली. त्यांनतर तक्रारदार यांनी समाजात बदनामी होईल या भीतीने महिला आरोपीला आयफोन 14 प्रो मॅक्स व दोन मोबाईल, लॅपटॉप, आय पॅड, स्कुटी, सोन्याची अंगठी व बांगड्या, कानातील झुमके, दोन एअर कंडीशनर, जिमचे संपूर्ण साहिय, फ्रिज, वॉशिंग मशिन तसेच इतर वस्तू घेऊन दिल्या. तसेच दोन आरोपींनी दुसऱ्या आरोपी महिलेला या गुन्हामध्ये मदत केल्याचे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Bhiwandi Honeytrap Case
Job Recruitment | राज्यातील सत्तर हजार पदांची नोकरभरती नव्या पद्धतीने होणार : मुख्यमंत्री फडणवीस

दरम्यान हनीट्रॅपमध्ये अडकून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तक्रारदाराने 6 फेब्रुवारी रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत हनीट्रॅपमध्ये अडकून लाखोंचा चुना लावणाऱ्या कुटुंबातील तिघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Bhiwandi Honeytrap Case
BMC Opposition Leader: माजी महापौर आता विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत

आरोपींना नोटिसा

या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावेळी गुन्हा दाखल असलेले आरोपी हे गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यातील धोराजी भागातील राहणारे असून त्यांनी तक्रारदार यांची 26 एप्रिल 2024 ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भिवंडीतील एका लॉजवर भेट होऊन त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचे सांगितले. दरम्यान सदरचा हा गुन्हा दाखल होताच आरोपींना हजर होण्यसाठी नोटीसा बजावण्यात आल्या असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड करीत असल्याचेही सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news