

ठाणे: पुढारी वृत्तसेवा
ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याने काही राजकीय पक्ष आणि ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत .त्यानंतर आपल्या निवास्थानी पुण्यातून मोर्चा येणार असल्याचे ट्विट देखील आव्हाड यांनी केले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आव्हाडांच्या निवासस्थानी जमा झाल्या. त्यांनी आव्हाडांच्या बाजूने आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना अडवले. त्यांना आव्हाडांच्या निवासस्थानापासून दूर नेले.
जितेंद्र आव्हाड यांनी २ दिवसांपूर्वी ठाण्यात जाहीर सभेत ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आराेप विराेधी पक्षांच्या नेत्यांनी केला हाेता. ओबीसी समाजातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आपण काेणत्याही समाजाचा अवमान केलेला नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे, असे आव्हाड यांनी सांगितले हाेते.
हेही वाचलं का?