फरहान-शिबानी दांडेकरचे मार्चमध्ये शुभमंगल होणार | पुढारी

फरहान-शिबानी दांडेकरचे मार्चमध्ये शुभमंगल होणार

पुढारी ऑनलाईन

बॉलीवूडमध्ये लग्‍नसराई सुरू झाली आहे. कॅटरिना-विकी, राजकुमार-पत्रलेखा यांच्या लग्‍नानंतर आता आणखी एक कपल लग्‍नबंधनात अडकणार आहे. बॉलीवूडमधील दुसरा परफेक्शनिस्ट फरहान-शिबानी दांडेकर गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. फरहान-शिबानी हे कपल मार्चमध्ये लग्‍न करणार असल्याचे कळते.

दोघांनी लग्‍नाची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतच कुटुंबीय आणि ठराविक मित्रांच्या उपस्थितीत लग्‍नाचे नियोजन केले जात आहे. मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेलही बुक केले गेले आहे. डिझायनर सब्यसाची याला दोघांच्या ड्रेसची ऑर्डरही देण्यात आली असल्याचे कळते.

Back to top button