नागरिक कोरोना नियम पाळणार नसतील तर निर्बंध आणावे लागतील : आरोग्य मंत्री राजेश टोपे | पुढारी

नागरिक कोरोना नियम पाळणार नसतील तर निर्बंध आणावे लागतील : आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई,  पुढारी ऑनलाईन : “कोरोना रुग्णांच्या संख्येची वाढ होत असल्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. मुंबई पाॅझिटिव्हीचा रेट ४ टक्क्यांवर आला आहे, ही आकडेवारी धोकादायक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य वेळीच ओळखलं नाही, तर परिणाम भोगावे लागतील. नागरिक नियम पाळणार नसतील निर्बंध आणावे लागतील. दोन दिवसांत निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे”, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे.

“लसीकरणासाठी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन काम करावं. राज्यात एकूण १७६ ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत.  ९१ ओमायक्राॅनबाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ८७ टक्के लोकांना कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. मुंबईत दररोज ५१ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. मागील ७ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे”, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

“राज्यात १३ कोटी २१ लोकांचं लसीकरण झालेलं आहे. मात्र, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढलेली आहे. स्थानिक नेत्यांन लोकांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांना कोरोनाचे नियम पाळावेत अनथ्या त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील”, असा इशाराही टोपे यांनी यावेळी दिला.

हेही वाचलं का? 

Back to top button