विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्‍कार, विरोधी पक्ष नेते फडणवीसांचा राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल | पुढारी

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्‍कार, विरोधी पक्ष नेते फडणवीसांचा राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

परीक्षा घोटाळ्यामुळे तरुणाईचा व्‍यवस्‍थेवरील विश्‍वास उडत आहे. अधिकार्‍यांच्‍या घरात दोन कोटींची रोकड सापडत आहे. विविध परीक्षांमध्‍ये झालेल्‍या भ्रष्‍टाचाराचा जाब राज्‍य सरकारला विचारणा आहोत, अशी माहिती आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशन उद्‍यापासून सुरु होत आहे. विरोधी पक्षांचे १२ आमदरांना वर्षभर निलंबित ठेवणार्‍या सरकारच्‍या चहापानाला कशासाठी जायचे. सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेल्‍या सरकारच्‍या चहापानावर बहिष्‍कार टाकण्‍याचा निर्णय घेतल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबरपासून मुंबई सुरु होत आहे. यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला. ते म्‍हणाले, पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्र सरकारने कमी केले;पण राज्‍य सरकारने कर कमी करायला हवे होते, ते झाले नाहीत. राज्‍य सरकारने विदेशी मद्‍यावरील कर कमी केला; पण पेट्रोल-डिझेलवरील व्‍हॅट कमी केला नाही. वसुलीचे टार्गेट ठेवूनच सर्व काम सूरु आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

परीक्षा घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्‍हावी

शेतकर्‍यांना केलेली मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहचलीच नाही. अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये अवैध दारुसह मटका सुरु आहे. गृहखातं कोण चालवंत ते माहित नाही, असेही ते म्‍हणाले. परीक्षा घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणीही त्‍यांनी यावेळी केली.

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : दोन वर्ष झोपला होता का?

राज्‍य सरकार ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत गंभीर नाही. गेली दोन वर्ष हा प्रश्‍न प्रलंबित आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयानेही इम्‍पीरिकल डाटा गोळा करण्‍यास सांगितले आहे. राज्‍य सरकार आता एम्‍पेरिअर डाटा मागत आहे. मागील दोन वर्ष सरकार झोपले होते का? असा सवालही त्‍यांनी केले.

कोरोना काळात झालेला भ्रष्‍टाचार बाहेर काढणार

शक्‍ती कायद्‍याला पाठिंबा देवू, मात्र लगुरु आणि कुलपतींच्‍या अधिकारांवर कब्‍जा करण्‍याचा सरकारच्‍या निर्णयाला आमचा विरोध आहे. कोरोना काळात झालेला भ्रष्‍टाचार आम्‍ही बाहेर काढणार आहोत. माध्‍यमांकडूनही ही आकडेवारी बाहेर येत आहे. यासंदर्भात सरकारला आम्‍ही विचारणा करणार आहोत.आमचे सभागृहात ऐकून घेतले नाही तर सभागृहाबाहेर आम्‍ही सरकारला जाब विचारणाच, असा निर्धारही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचलं का? 

 

Back to top button