Pushpa: अल्लू अर्जुन-रश्मिका मंदनाचा 'तो' अ‍ॅडल्ट सीन हटवणार? | पुढारी

Pushpa: अल्लू अर्जुन-रश्मिका मंदनाचा 'तो' अ‍ॅडल्ट सीन हटवणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क

पुष्पा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी जी चर्चा रंगली ती आगळीकचं! साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांचा ‘पुष्पा: द राइज – पार्ट १’ रिलीज झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरने नुसता धुमाकूळ घातला. आता तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केलीय. या चित्रपटाचा दुसरा पार्ट नव्या वर्षात रिलीज होणार आहे. या चित्रपटातील सीनची सर्वाधिक चर्चा झाली ती अ‍ॅडल्ट सीनची. रश्मिका आणि अल्लूचा ॲडल्ट सीन चित्रपटात टाकण्यात आला; पण, प्रेक्षक हा सीना पाहून संतापले. त्यामुळे निर्मात्यांना तडकाफडकी निर्णय घेण्यात आला.

अवघ्या तीन दिवसांमध्ये पुष्पा या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. पाच भाषांमध्‍ये हा चित्रपट रिलीज झालाय. त्यामुळे चित्रपटातील कलाकार, त्यांचा अभिनय, ॲक्शन आणि लोकेशन याची चर्चा रंगली. त्याचबरोबर, साऊथ स्टार सामंथाचा आयटम सॉन्गदेखील प्रेश्रकांच्या पसंतीस उतरला. याची चर्चा सुरू असतानाचं या चित्रपटातील ॲडल्ट सीनची गरमागरम चर्चा रंगली.

Pushpa Movie Review: Only Color No Fragrance

रिलीज झालेला ‘पुष्पा’ सध्या ट्रेंडवरील चित्रपट आहे. पण, चित्रपटात एका सीनमुले प्रेक्षकांनी कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. चित्रपटात असा एक सीन आहे, जो आपण, आपल्या फॅमिलीसोबत पाहू शकत नाही. त्यामुळे या सीनमुळे वाद निर्माण झाला.

Pushpa's 'Saami Saami': Delay In Hindi Version Dismays Fans

आता मीडिया रिपोर्टनुसार, पुष्पा चित्रपटातील हा सीन काढून टाकला जाणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. ॲडल्ट सीन आपण आपल्या कुटुंबासोबत  पाहू शकत नाही. त्यामुळे निर्माते हा सीन हटवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर, हा चित्रपट सिनेमागृहात लागला आहे. त्याचा कालावधी ३ दिवसांचा आहे. त्यामुळे चित्रपटातील आणकी काही दृश्ये कट केली जाणार असल्याची माहिती समोर येतेय.

Put on your dancing shoes and get grooving to Saami Saami from Pushpa

पुष्पा: द राईजचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. याची कथा एका लाल चंदन तस्कराची आहे. आंध्र प्रदेशातील शेषाचलम हिल्समधील लाल चंदन तस्कर आणि त्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कहाणी आहे.

SaamiSaami (Malayalam) | Pushpa - The Rise | Allu Arjun, Rashmika | DSP | Sithara | Sukumar - YouTube

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

Back to top button