

कर्जत; पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायतची निवडणूक यावेळी मोठ्या चुरशीची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे प्रामुख्याने या दोन नेत्यांमध्ये ही निवडणूक होत आहे.
एकूण बारा जागांसाठी मतदान होत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली होती. आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे या दोघांनीही मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सकाळच्या टप्प्यात मतदानाला तुरळक प्रतिसाद पहायला मिळाला. दुपारपर्यंत जवळपास ४५ टक्के मतदान पूर्ण झाले होते.
हेही वाचा