Jacqueline Fernandez vs ED : जॅकलिन फर्नांडिस देशाबाहेर जात असतानाच ईडीने तिला मुंबई विमानतळावर थांबवले | पुढारी

Jacqueline Fernandez vs ED : जॅकलिन फर्नांडिस देशाबाहेर जात असतानाच ईडीने तिला मुंबई विमानतळावर थांबवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही देशाबाहेर जात असतानाच ईडीने तीला मुंबई विमानतळावर थांबवले. २०० कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश असल्याने तिला बाहेर जाण्यापासून थांबवण्यात आले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकव्हरी प्रकरणाचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीनला 10 कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये आलिशान गाड्या, घोडे आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते. (Jacqueline Fernandez vs ED)

Diogo Alves : ७० माणसांची हत्या करणाऱ्याचं मुंडकं १५० वर्षांपासून का जतन करून ठेवलंय? 

नेमके काय आहे प्रकरण

सुत्रांच्या माहितीनुसार सुकेश याने जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline) १० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये विविध प्रकारची आभुषणे, हिरेजडीत दागिने, क्रॉकरी, चार फ्रेंच जातीची मांजरे (एका मांजराची किंमत अंदाजे एक लाख रूपये) आणि ५२ लाख रूपये किंमतीचा एक घोडा पण आहे. त्याचबरोबर सुकेशने जॅकलीनचा भाऊ आणि बहिणीलाही मोठी रक्कम पाठवली होती. त्यानंतर ईडीने जॅकलिनच्या जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती. (Jacqueline Fernandez vs ED)

त्याचबरोबर सुकेशने नोरा फतेहीलाही बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटींहून अधिक होती. तिहार तुरुंगातून 200 कोटी वसूल केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

या आरोपपत्रात असेही म्हंटले आहे की, सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात असताना, अधून मधून जॅकलिनशी मोबाईलच्या माध्यमातून बोलत होता. तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटही बुक केली होती. तसेच जॅकलीन फर्नांडिससाठी मुंबई ते दिल्लीचे चार्टर्ड फ्लाइटही बुक केले होते.

हेही वाचा

Back to top button