Donald Trump : अफगाणमधून सैन्‍य माघारीचा निर्णय घेणारे अमेरिकेचे जनरल मार्क मिली महामुर्ख : डोनाल्‍ड ट्रम्‍प | पुढारी

Donald Trump : अफगाणमधून सैन्‍य माघारीचा निर्णय घेणारे अमेरिकेचे जनरल मार्क मिली महामुर्ख : डोनाल्‍ड ट्रम्‍प

वॉशिंग्‍टन : पुढारी ऑनलाईन

अफगाणिस्‍तानमधून अमेरिकेने सैन्‍य हटविण्‍याच्‍या निर्णयावर माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प ( Donald Trump ) हे पुन्‍हा एकदा भडकले. एका सभेत त्‍यांची जीभ घसरली. यावेळी संतत्‍प झालेल्‍या ट्रम्‍प यांनी अमेरिकेच्‍या लष्‍कराचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मार्क मिली यांच्‍यावर टीकेची झोड उठवली.

यावेळी ट्रम्‍प ( Donald Trump )  म्‍हणाले की, मिली मला म्‍हणाले होते की, अफगाणिस्‍तामधून अमेरिकन सैन्‍य माघारी बोलविण्‍यात आले. तसेच अमेरिकेचे सैनिक आपलेी शस्‍त्रही अफगाणिस्‍तानमध्‍येच सोडून आली आहेत. त्‍यांच्‍या या विधानावर मला लक्षात हे की, मिली हे महामुर्ख आहेत. ट्रम्‍प यांनी थेट जाहीर सभेतच मिली यांच्‍यावर टीकेची झोड उठवली.

यापूर्वीही ट्रम्‍प हे अफगाणिस्‍तानमधील सद्‍यस्‍थितीबाबत अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडन यांच्‍यावर कठोर टीका केली हाेती. त्‍यांनी म्‍हटलं होतं की, अमेरिकेने अफगाणिस्‍तानमधून सैन्‍य माघारी घेतले. यामुळेच तालिबान्‍यांचा कहर झाला. तालिबानने काबूलवर कब्‍जा केला त्‍या दिवशी ट्रम्‍प म्‍हणाले होते की, अफगाणिस्‍तानमध्‍ये बायडन यांनी जे काही केले ते महानच होते. अमेरिकेच्‍या इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव असल्‍याची नोंद होईल, असेही त्‍यांनी म्‍हटलं होते.

अमेरिकेच्‍या लष्‍कराचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मार्क मिली यांनी म्‍हटलं होतं की, अफगाणिस्‍तानमधील २० वर्षांची लढाई हे ‘अपयश’च होते. अफगाणिस्‍तानमध्‍ये तालिबानचा हस्‍तक्षेप रोखण्‍यासाठी अमेरिकेने काही हजार सैनिक तेथे तैनात ठेवायला हवे होते, असे माझं व्‍यक्‍तिगत मत असल्‍याचेही मार्क मिली यांनी म्‍हटलं होतं.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button