कोरोनाच्या व्हॅरिएंटला नावं कशी दिली जातात? | पुढारी

कोरोनाच्या व्हॅरिएंटला नावं कशी दिली जातात?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात आढळलेल्या कोरोनाच्या व्हॅरिएंटला डेल्टा हे नाव देण्यात आलं होतं, तर सध्या दक्षिण आफ्रिकेत शोधला गेलेल्या कोरोनाच्या व्हॅरिएंटला ओमायक्रॉन हे नाव देण्यात आले आहे. ओमायक्रॉन हे ग्रीक भाषेतील १५ व्या क्रमांकाचे अक्षर आहे, त्यावरून हे नाव देण्यात आलं आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोरोनाच्या व्हॅरिएंटला नाव दिलं कसे जाते.

कोरोनाच्या व्हॅरिएंटला नाव देण्याची पद्धत जागतिक आरोग्य संघटनेने विकसित केली आहे. लोकांतील गोंधळ होऊ नये, असा या मागचा उद्देश आहे. तसेच एखाद्या प्रदेशाचे नाव जर व्हायरसला दिले तर त्या प्रदेशाबद्दल लोकांच्या मनात तिरस्काराची भावना तयार होते, हे टाळण्यासाठी ही पद्धत विकसित करण्यात आली आहे.

भारतात तो व्हॅरिएंट आढळून आला त्याचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे, पण तो डेल्टा या नावाने ओळखला जातो. डेल्टा हे ग्रीक भाषेतील क्रमांक चारचे अक्षर आहे. आतापर्यंत व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून ओळखले गेलेले एकूण ७ कोरोना व्हॅरिएंट आहेत.

पण ग्रीकमधील काही अक्षर कोरोना व्हॅरिएंटना नाव देण्यासाठी वापरलेली नाहीत. Nu (नू) आणि XI ही दोन अक्षर जागतिक आरोग्य संघटनेने टाळलेली आहेत.  कोणतीही संस्कृती, समाज, देश, धर्म, व्यवसाय आणि वंश समूह यांचा अपमान होणार नाही, अशा प्रकारचे नाव व्हायरसच्या व्हॅरिएंटला दिलं जाते.

यातील काही व्हायरसना व्हॅरिएंट ऑफ इंट्रेस्टही म्हटलेले आहे. त्यांना लँबडा आणि म्यू अशी नावं दिली गेली आहेत.
पण व्हायरला जी तांत्रिक नावं आहेत ती मात्र बदलली जात नाहीत कारण ती संशोधनाच्या कामासाठी उपयुक्त असतात.

हेही वाचलत का?

Back to top button