Prashat kishor : प्रशांत किशोर आणि राहुल गांधींच्या दोस्तीत कुस्ती सुरु ! किशोरांचा कडाडून प्रहार - पुढारी

Prashat kishor : प्रशांत किशोर आणि राहुल गांधींच्या दोस्तीत कुस्ती सुरु ! किशोरांचा कडाडून प्रहार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आणि राजकीय रणनितिकार प्रशांत किशोर (Prashat kishor) यांच्यात अंतर निर्माण होत असल्याचे चित्र आहे. प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुंबईत काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर आता प्रशांत किशोर (Prashat kishor) यांनी राहुल गांधी यांच्यावर थेट टीका केली आहे.

प्रशांत किशोर म्हणतात, (Prashat kishor) “काँग्रेसने गेल्या १० वर्षांत ९० टक्के निवडणुकांत पराभव पत्करला आहे. जो विचार आणि ज्या राजकीय स्थितीचे काँग्रेस प्रतिनिधित्व करते ते विरोधी पक्षासाठी आवश्यक आहे. पण काँग्रेसचं नेतृत्त्व कोण्या एका व्यक्तीचा दैवी अधिकार नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचं नेतृत्त्व हे लोकशाही मार्गाने ठरवले पाहिजे.”

ममता बॅनर्जी यांनीही राहुल गांधीवर टीका आहे. त्यांनी म्हटलं होतं, “राजकारण ही सातत्याने करायचे प्रयत्न आहेत. जो व्यक्ती काही करत नाही आणि अर्धाअधिक वेळ परदेशात असतो, तो नेतृत्व कसे करणार?” UPA म्हणजे काय? UPA अस्तित्वात नाही? अशी टीकाही त्यांनी केली होती.

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगलामधील कँपेनचे नियोजन प्रशांत किशोर यांनी केले होते. ही निवडणूक तृणमूल काँग्रेसने जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढले.

प्रशांत किशोर (Prashat kishor) आगामी उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला सहकार्य करत होते. पण त्यावरून प्रशांत किशोर यांची कार्यशैली आणि नेमकी जबाबदारी यावरून प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबीय यांच्यात मतभेद झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसलाही त्यांच्या निशाण्यावर घेतले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button