मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रिलायन्स रुग्णालयातून २१ दिवसांनंतर गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, त्यांना मंत्रालयाऐवजी वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित देसाई यांनी दिला आहे.
12 नोव्हेंबर रोजी डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया केली होती.
मुख्यमंत्री ठाकरे यांना चार दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र, त्यांची प्रकृती सुधारण्यास वेळ लागला. त्यामुळे त्यांना २१ दिवस रुग्णालयात रहावे लागले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभेचा हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत नागपूरऐवजी महाराष्ट्रात होणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना मानदुखीचा प्रचंड त्रास होता. शस्त्रक्रिया न करता हे दुखणे कमी होते का यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र मानदुखी थांबत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्याप्रमाणे मान आणि खांद्याच्या मध्ये ही शस्त्रक्रिया होणार आहे. ती तासाभरात पूर्ण होईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना फिजिओथेरपी आणि अन्य उपचार दिले जात होते. त्यामुळे त्यांना बरे होण्यास दीर्घ काळ लागला. मात्र, आता त्यांनी मंत्रालयात जाण्याऐवजी घरातून काम करावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे हे मंत्रालयाऐवजी घरातून काम करतात अशी टीका विरोधक करत आहेत. त्यामुळे ठाकरे डॉक्टरांचा सल्ला कितपत मानतात हे पहावे लागणार आहे.
याबाबत हृदयरोगतज्ज्ञ डॉ अजित देसाई म्हणाले,' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना आता पुढील काही दिवस घरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.' मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात तसा उल्लेख आहे.
हेही वाचा :