कोरोना आणि डब्ल्यूएचओ बोगस, कालीपुत्र कालीचरण महाराज यांची मुक्ताफळे - पुढारी

कोरोना आणि डब्ल्यूएचओ बोगस, कालीपुत्र कालीचरण महाराज यांची मुक्ताफळे

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : देशातील हिंदू हा भाषावाद आणि जातीयवादावर विभागला आहे. परंतु संपूर्ण देशावर राज्य करायचे असेल तर सर्व हिंदुंनी त्याग केला पाहिजे. सर्व हिंदू एक होवून देशावर हिंदुचे राज्य करण्यासाठी हिंदू व्होट बँक तयार करून देशाचे हिंदूकरण होणे गरजेचे आहे. तसेच कोरोना आणि डब्ल्यूएचओ बोगस असल्याचे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी पत्रकार बैठकीत केले.

कालीपुत्र कालीचरण महाराज यावेळी म्हणाले की, देशासह जगावर हिंदू राष्ट्र व्हावे, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा होती. परंतु, सध्या हिंदू हा भाषावाद आणि जातीवादावर विभागाला आहे. तो एक होणे गरजेचे आहे. जगात सनातन हिंदू धर्म हाच श्रेष्ठ आहे. परंतु, हिंदू धर्मात काही विघटक आहेत. त्यांना साफ करणे गरजेचे आहे. हा देश संपूर्ण हिंदूचा होणे गरजेचे आहे आणि देशातील तरुण ते करतील असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, देशातील सर्व हिंदू एक करून देशातील राजकीय व्होट बँक तयार केली पाहीजे. देशात विकास पाहीजे. आणि आता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे. यासाठी इतिहासात हिंदूवर झालेला अन्याय पटवून देणे आवश्यक आहे. परंतु, अनेकजण हिंदू धर्मासाठी काम करणे सोडून जातीसाठी माती खाण्याचा उद्योग करीत आहेत. असे न करता सर्व हिंदूनी एकत्र होवून देशावर हिंदूंची सत्ता स्थापन करावी, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, जगात कोरोना नाही, कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारण्यात आली आहेत. डब्ल्यूएचओ बोगस आहे. कोरोनाची निव्वळ भिती निर्माण करण्यात आली आहे. कोरोनाची असलेली लक्षणे ही किरकोळ लक्षणे आहेत.

कोरोना ही महामारी नाही. महामारीत लोक पटापट मरतात. परंतु, कोरोनापासून वाचण्यासाठी डब्ल्यूएचओने व्हॅक्सीन घेण्यास सांगितले. डब्ल्यूएचओ आणि व्हॅक्सीन तयार करणार्‍या कंपनीचे मिलिभगत आहे. रेमडेसिवीर बोगस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थानचे नितीन चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button