RIP Chandrakant Jadhav : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली | पुढारी

RIP Chandrakant Jadhav : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली

पुढारी ऑनलाईन डेस्क : “मुळचे खेळाडू असलेल्या आमदार चंद्रकांत जाधव (RIP Chandrakant Jadhav) यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेसचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आज अकाली निधन (RIP Chandrakant Jadhav) झाले. त्यांची कारकिर्दी जरी अल्प ठरली पण या दोन वर्षांतील त्यांचं काम कोल्हापूरकरांच्या सदैव लक्षात राहाणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा फडवणारे अण्णा आपल्यात नाहीत, ही बातमी पचवनं कोल्हापूरकरांना कठीण जात आहे.

२०१९ची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला सुरुवातीला उमेदवारही शोधावा लागत होता. शिवसेनेचे दोन वेळचे आमदार राजेश क्षीरसागर यांचं पारडं जड दिसत होते. त्यात कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ तर शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेची पारंपरिक व्होट बँक भक्कम असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होईल, असा फारसा कुणी विचार केला नव्हता.

काँग्रेसच्या उमेदवारीची माळ चंद्रकांत जाधव यांच्या गळ्यात पडली. भाऊ नगरसेवक असल्याने चंद्रकांत जाधव महापालिकेच्या राजकारणात सक्रीय होते. उद्योजक असल्याने उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या समस्या सोडवण्यातही त्यांचा पुढाकार असायचा. शिवाय कोल्हापूर शहरातील तालीम संस्था, खेळाडू, तरुण मंडळ यांना ते सडळ हाताने मदत करत असतं. पण कोल्हापूर शहराची आमदारकी मिळवणं सोपं नव्हतं. पण जाधव यांनी नेटाने प्रचार केला. आताचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील आणि तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांचे पाठबळ बरोबर होते.

क्षीरसागर सलग २ वेळा आमदार होते, त्यामुळे त्यांच्याविरोधात जनमत जात आहे हा अंदाज जाधव यांना आला होता, त्यांनी त्या पद्धतीने आपली यंत्रणा कार्यरत केली. ते मंगळवार पेठेतील असल्याने हा परिसर त्यांच्या पाठीशी राहिला. बघता बघता निवडणुकीची हवा फिरू लागली आणि जाधव यांनी १५ हजार मतांनी विजयी मिळवला.

हे वाचलंत का? 

Back to top button