Leopard attack : बिबट्याच्या हल्ल्यात ४ मेंढ्या आणि एक घोडा ठार | पुढारी

Leopard attack : बिबट्याच्या हल्ल्यात ४ मेंढ्या आणि एक घोडा ठार

आंबेगाव (पुणे); पुढारी वृत्तसेवा : येथील शिंगवे (ता. आंबेगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या व घोडा ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. २) मध्यरात्री बारा वाजता घडली. बिबट्याच्या हल्ल्यात बबन म्हस्कू करगळ या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. (Leopard attack)

शिंगवे गावातील उत्तर दिशेला गोरडे मळा ते भागडी रस्त्यावर तोरणा डोंगर आहे. येथील गणेश सतू कासार यांच्या शेतामध्ये बबन करगळ या धनगर मेंढपाळाचा वाडा मुक्कामी आहे. बुधवारी (दि. १) सायंकाळी वाडा करून त्यामध्ये मेंढ्या सोडल्या होत्या. वाड्याच्या कडेला घोडा बांधला होता. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घोड्यावर हल्ला करीत घोड्याला जागीच ठार केले. त्यानंतर बिबट्याने वाड्यात प्रवेश केला.

वाड्यातील चार मेंढ्यांना जागीच ठार केले. हा सर्व थरारक प्रकार बबन मस्कू करगळ, त्यांचा मुलगा बाळू म्हस्कू करगळ यांच्यासमोर घडला. परंतु बिबट्या पूर्ण वाढ झालेला असल्याने त्यांचे धाडस झाले नाही. (Leopard attack)

बबन करगळ यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली आहे. दरम्यान बबन करगळ यांच्या दोन मेंढ्या अवकाळी पाऊस व थंडीने गारठल्या असून, त्या अत्यवस्थ आहेत.

हेही वाचा

Back to top button