ठाणे, डोंबिवली मध्ये पावसाच्या सरी, ‘हिवसाळा’ असल्याचे मेम्स व्हायरल | पुढारी

ठाणे, डोंबिवली मध्ये पावसाच्या सरी, 'हिवसाळा' असल्याचे मेम्स व्हायरल

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा :  हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार  बुधवारी सकाळपासून ठाणे, डोंबिवली परिसरात पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्याने अनेकांनी ‘हिवसाळा’ अशा आशयाचे मीन्स बनवून पोस्टर टाकले आहेत.

इतकेच नव्हे तर हवामान खात्याचे अंदाज अचूक येत असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला जात आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झालीय.

या सर्वांमुळे पुढील काही तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच दिला होता.

त्यानुसार बुधवार सकाळपासून पावसाच्या मध्या हलक्या सरी कोसळत असून प्रचंड प्रमाणात शेतीचे  नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षांनी सुरू झालेल्या शाळांना जून महिण्याप्रमानेच हजेरी लावून शाळा सुरू करण्याची पावसानेच ग्वाही दिली, अशी चर्चा देखील पालकांमध्ये रंगलेली पाहायला मिळत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button