Manohar Joshi | ‘ते नेहमीच एकनिष्ठ राहिले’; जोशींच्या निधनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया | पुढारी

Manohar Joshi | 'ते नेहमीच एकनिष्ठ राहिले'; जोशींच्या निधनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून वेगळी ओळख असणारे मनोहर जोशी यांचे आज (दि.२३) पहाटे निधन झाले. ‘ते नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ राहिले’ अशी प्रतिक्रिया मनोहर जोशींच्या (Manohar Joshi) निधनावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ‘ANI’ वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

जोशींच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान-ठाकरेंची प्रतिक्रिया

‘ANI’ वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मनोहर जोशींचे जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. मनोहर जोशी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, पण त्यांनी कधीही शिवसेना सोडली नाही, ते नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ राहिले. बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली तेव्हा, त्यांच्यासोबत अटक झालेल्यांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Manohar Joshi)

हेही वाचा:

Back to top button