PM Narendra Modi On Manohar Joshi | ‘व्यासंगी, मेहनती आमदार…’PM मोदींनी वाहिली मनोहर जोशींना श्रद्धांजली

PM Narendra Modi On Manohar Joshi
PM Narendra Modi On Manohar Joshi

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे शुक्रवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीएम नरेंद्र मोदी यांनी देखील मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पीएम मोदींनी जोशींसोबतची आठवण एक्स पोस्ट करत शेअर केली आहे. (PM Narendra Modi On Manohar Joshi)

 …त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले

पीएम मोदींनी म्हटले आहे की, "मनोहर जोशी यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक दिग्गज नेते होते, ज्यांनी लोकसेवेत अनेक वर्षे घालवली आणि महापालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले," असे पीएम मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. (PM Narendra Modi On Manohar Joshi)

चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेला 'आमदार'

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात आपल्या संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला. मनोहर जोशी जी चारही विधीमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेले आमदार म्हणून त्यांच्या मेहनतीबद्दलही स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती संवेदना. ओम शांती, अशा शब्दांत पीएम मोदींनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे. (PM Narendra Modi On Manohar Joshi)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news