माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात उपचार सुरू | पुढारी

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात उपचार सुरू

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. व त्यांना सर्वोत्तम उपचार मिळत असल्याचे प्रसिद्धीपत्र हिंदुजा रुग्णालयाने जारी केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही रूग्णालयाने सांगितले आहे.

२१ फेब्रुवारीला त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल आहेत. याआधीही त्यांना दोनदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

हेही वाचा :

 

 

 

 

Back to top button