Reliance Market Capitalisation |’रिलायन्स’ची कमाल! बनली २० लाख कोटींचे मार्केट कॅप ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी

Reliance Market Capitalisation |’रिलायन्स’ची कमाल! बनली २० लाख कोटींचे मार्केट कॅप ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी

पुढारी ऑनलाईन : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तेजी कायम आहे. आज मंगळवारी बीएसईवर हा शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढून २,९५७ रुपयांवर गेला. हा या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. तर हा ​शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत सुमारे १४ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज २० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय सूचीबद्ध कंपनी बनली आहे. (Reliance Market Capitalisation)

रिलायन्स शेअर्सने मंगळवारी बीएसईवर २,९५७ रुपयांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला. आज १३ फेब्रुवारी रोजी तो इंट्राडे १.८ टक्के वाढला. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हा शेअर्स १.३० टक्के वाढीसह २,९४० रुपयांवर होता.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ऑगस्ट २००५ मध्ये १ लाख कोटी रुपये, एप्रिल २००७ मध्ये २ लाख कोटी रुपये, सप्टेंबर २००७ मध्ये ३ लाख कोटी रुपये आणि ऑक्टोबर २००७ मध्ये ४ लाख कोटी रुपयांवर होते. तेव्हापासून जुलै २०१७ मध्ये ५ लाख कोटी रुपयांवर बाजार भांडवल पोहोचण्यासाठी रिलायन्सला १२ वर्षे लागली. तर नोव्हेंबर २०१९ मध्ये बाजार भांडवल १० लाख कोटी आणि सप्टेंबर २०२१ मध्ये १५ लाख कोटींवर पोहोचले. त्यानंतर २० लाख कोटी रुपयांचा टप्पा सुमारे ६०० दिवसांत गाठला.

जानेवारीमध्ये हा शेअर्स १०.४ टक्क्यांनी वाढला. तर फेब्रुवारीमध्ये जवळपास ४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

आता रिलायन्स ही २० लाख कोटींवर बाजार भांडवल असलेली RIL ही भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी बाजार भांडवलात टीसीएस (१५ लाख कोटी रुपये), एचडीएफसी बँक (१०.५ लाख कोटी), आयसीआयसीआय बँक (७ लाख कोटी) आणि इन्फोसिस (७ लाख कोटी) च्या पुढे आहे. (Reliance Market Capitalisation)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news