'ते' सगळे व्हिडिओ समोर आणणार; जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना इशारा | पुढारी

'ते' सगळे व्हिडिओ समोर आणणार; जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राची थट्टा सुरु आहे का? निवडणूक आयोग्याच्या निर्णयामुळे जनता दुखावली गेलीय. शरद पवारांना त्रास देणं अजित पवारांना शोभत नाही. शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी कट सुरु आहे. ते सगळे व्हिडिओ समोर आणणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यावेळी एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी सर्व प्रसारमाध्यमांना दाखवला.

संबंधित बातम्या –

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, निवडणूक आयोग म्हणजे कठपुतली झाली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलतंय किंवा विसरभोळ झालं आहे. २०१९ पासून राष्ट्रवादीत मतभेद होते, असं आयोगाला कुणी सांगितलं? आमच्याकडे सर्व व्हिडिओ आहेत. यावर आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. महापत्रकार परिषद घेऊन सगळे व्हिडिओ दाखवणार.

Back to top button