Female Cop Viral Dance Video : महिला पोलिसाचा वर्दीत डान्स; नेटकरी फिदा

Female Cop Viral Dance Video : महिला पोलिसाचा वर्दीत डान्स; नेटकरी फिदा

नवी दिल्ली : सोशल मीडियावर नृत्याविष्काराचे रिल्स व्हायरल होत असल्याचे चित्र नवीन नाही. मात्र एका व्हिडीओने धमाल उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल मुगल-ए-आझम चित्रपटातील 'किसी दिन मुस्करा कर ये नजारा हम भी देखेंगे' या गीतावर नृत्य करीत आहे.

तिच्या अदाकारीवर नेटिझन्स जाम खूश झाले आहेत. पोलिसाच्या वर्दीत तिने नृत्य करून अदाकारी पेश केली आहे. तिच्या नृत्याचे रिल व्हायरल झाले आहे. लाखो यूजर्सनी तिच्या व्हिडीओवर लाईक केले आहे. नृत्यप्रसंगी तिने सादर केलेले हावभाव पाहून थक्क होण्याची वेळ आल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ पाहून काहीजण या महिलेचे चाहते झाले आहेत. काहींनी तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले आहे; तर काहींनी कर्तव्यावर असताना नृत्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याने तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news