

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने कामगार संघटनांशी चर्चा करावी. एसटी कर्मचार्यांच्या ( st strike in maharashtra ) संपाबाबत सकारात्मक तोडगा काढावा, अशी सूचनाही आज ( दि.२२ ) उच्च न्यायालयाने केली. एसटी संपाबाबत आता २० डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
एसटी संपामुळे( st strike in maharashtra) राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे याप्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
एसटी कर्मचार्यांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब याच्यात बैठक झाली. यावेळी परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना अनिल परब म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी महामंडळातील कर्मचार्यांचा संप सुरु आहे. यामुळे शाळेतील मुलांचे आणि ग्रामीण भागातील जनतेचे मोठे हाल होत आहेत. यामुळे आज शरद पवार यांनी चर्चा केली. संप मिटविण्यासाठी कोणते मार्ग काढले जातील,एसटीची आताची आर्थिक परिस्थिती यावर चर्चा झाली. भविष्यात कोणकोणत्या उपाययोजनां करता येतील, याबाबत शरद पवार यांनी चर्चा केली, असेही परब म्हणाले.