Nashik : पोलिस भरती परीक्षेत नापास झाल्याने युवकाची आत्महत्या | पुढारी

Nashik : पोलिस भरती परीक्षेत नापास झाल्याने युवकाची आत्महत्या

सिडको (नाशिक); पुढारी वृत्तसेवा

पोलिस भरती परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सिडकोत उघडकीस आला आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल भानुदास चौगुले (वय 22 रा. एक्सलो पॉईंट, अंबड) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Nashik Suicide)

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भानुदास चौगुले यांचा मुलगा राहुल याने गेल्या आठवड्यातच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर आपण त्यामध्ये नापास झाल्याने त्याला नैराश्य आले. या नैराश्येतून राहुलने शनिवार दिनांक 20 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. (Nashik Suicide)

त्यानंतर त्याला उलट्या व अन्य त्रास होऊ लागल्याने वडील भानुदास चौगुले यांनी राहुलला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हे ही वाचा :

Back to top button