Shivsena MLA Disqualification : निकालाआधी संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले मॅच फिक्सिंग… | पुढारी

Shivsena MLA Disqualification : निकालाआधी संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले मॅच फिक्सिंग...

पुढारी ऑनलाईन डेस्क : “भाजप, विधानसभा अध्यक्ष आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री यांची मॅच फिक्सिंग झाली आहे. अध्यक्षांचा आजचा निर्णय हा फक्त औपचारिक आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची भेट ही मॅच फिक्सिंगसाठीच होती. त्यामुळेच पंतप्रधान दौऱ्यावर येत आहेत, शिवाय मुख्यमंत्री शिंदे आगामी दौरे करत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज (दि.१०) माध्यमांशी ते बोलत होते.

शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील तब्बल चार महिन्यांच्या कामकाजानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. पात्र-अपात्रतेचा निकाल जाहीर होणार असल्याने अध्यक्षांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे सहकारी आमदार आणि ठाकरे गटाच्या आमदारांचे भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे निकालापूर्वीच मंगळवारी राज्यातील राजकीय वातावरण भलतेच तापले. दोन्ही गटांनी एकमेकांवर शरसंधान साधण्याची संधी साधली, तर नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला. त्यानुसार 14 सप्टेंबरपासून राहुल नार्वेकर यांनी याचिकांवर सुनावणी सुरू केली. २० डिसेंबर रोजी अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार बुधवारी विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button