

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिल्कीस बानो प्रकरणी (Bilkis Bano case) निर्णय देताना राजकीय हस्तक्षेप होऊ देवू नये. आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. या प्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षा माफ करण्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा गांभीर्याने विचार करणे गरजेच आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बिल्कीस बानोला (Bilkis Bano case) न्याय मिळावा असा निर्णय सरकारने घ्यावा. सामन्य माणसाला आधार मिळण्यासारखा कोर्टाने निर्णय घेतला आहे, असही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आज दिल्लीत जागावाटपाबाबत महाविकासआघाडीची बैठक होत आहे. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. पक्षाच्या हिताच्या दृष्टीने भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीत एकत्र काम करण्याबाबत चर्चा होणार आहे. जागावाटपाच्या चर्चेत डाव्या पक्षांना सहभागी करून घ्यावं, वंचितला सोबत घ्यावं, अशी आमची भूमिका आहे, असंही पवार यांनी सांगितले. दिल्लीतील सरकार बदलत नाही तोवर धाडसत्र सुरूच राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यावर दिली.
हेही वाचा :