आमदार रविंद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड | पुढारी

आमदार रविंद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : जोगेश्वरी येथे जमीन वापराच्या अटींमध्ये फेरफार करून हॉटेल बांधल्याच्या प्रकरणाच्या संदर्भात उद्धव गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या भागीदारांशी संबंधित ७ ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहेत. आमदार वायकर यांच्या घरावर ईडीने आज (दि.९) सकाळी धाड टाकली. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात याआधीही वायकर यांची चौकशी झाली आहे.

जोगेश्वरीचे आमदार वायकर यांच्या निवासस्थानी सकाळी साडेआठच्या दरम्यान ईडीचे अधिकारी दाखल होताच काही वेळानंतर निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. वायकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. किरीट सोमय्यांकडून त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत वारंवार तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. यानंतर आज ईडीकडून वायकर यांच्या जोगेश्वरी येथील निवास स्थानावर छापेमारी करण्यात आली.

हेही वाचा : 

 

Back to top button