

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: सदनिका देतो असे सांगत डोंबिवलीतील एकाने २८ लाख उकळले आहेत. कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला असलेल्या एका नागरिकाची डोंबिवलीतील एकाने तब्बल २८ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तरीही फसवणूक करणाऱ्यावर पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.
तक्रारदाराने पुन्हा पोलिसांना तक्रार अर्ज करून सदर व्यक्तीकडून जिवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तरी पोलीस सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथील म्हात्रेनगरमधील आकृती सुरज कॉम्पेल्समध्ये राहणारे माणिक मैशेरी यांना मालकीचे घर खरेदी करायचे होते. त्यासाठी मैशेरी हे चौकशी करत होते.
डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथील मौजे आजदे गोळवली सर्वे नंबर १७५९,१७५७,१७५७,१७८०,१७८१ येथील वसंत हाईट्स या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील ६२० स्वेअर फुटचा सदनिका नंबर ७०५ ही २४ लाख रुपयास घेण्याचे ठरविले.
अधिक वाचा
विरल पैठाणी या विकासकाने इमारतीचे बांधकाम केले होते. मैशेरी यांनी विरल यांची भेट घेऊन सदनिकाबाबत माहिती घेतली. दोघांमध्ये चर्चा झाल्यावर मैशीरी यांनी सदर ठिकाणी रूम घेण्याचा निर्णय घेतला.
ठरल्याप्रमाणे मैशीरी यांनी चेकद्वारे विरलला २६ लाख रुपये आणि सदनिका नोंदणी व सोसायटी मेंबरसाठी असे दोन लाख असे एकूण २८ लाख रुपये घेतले. मात्र, एवढी मोठी रक्कम घेऊन विरल याने मैशीरी याला सदनिकेचा ताबा दिला नाही.
मैशीरी यांनी वारंवार विरलकडे सदनिका अथवा दिलेले २८ लाख रुपये परत द्यावे अशी मागणी केल्यावर विरलने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली.
अधिक वाचा
आता आपल्याला न्याय हवा असेल तर पोलिसांकडे जावे लागेल या विचाराने मैशेरी यांनी याबाबत १८ जुन २०२० रोजी रामनगर पोलीस ठाण्यात विरल पैठानी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
परंतु पोलिसांनी मैशेरी यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
याचदरम्यान मैशेरी याच्या भावाच्या गाडीची अज्ञात इसमांनी तोडफोड केली होती. याची तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
विरल याने फिर्यादी मैशेरी यांना`पोलीस ठाण्याच्या बाहेर तुला काय करायचं ते कर'. 'माझ्यावर गुन्हा दाखल केला तर माझी ओळख वरपर्यंत आहे.' तसेच तुझी वाट लावेन अशी धमकी मैशेरी यांनी दिली.
अधिक वाचा
यानंतर मैशेरी यांनी १४ तारखेला पुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विरल पैठाणी आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून मला व माझ्या कुटुंबियाकडून जिवितास धोका असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान पोलिसांनी वेळीच विरल पैठाणी याच्यावर कारवाई केली असती तर एका सर्वसामान्य नागरिकांना एवढा त्रास सहन करावा लागला नसता अशी चर्चा परिसरात सुरु झाली आहे.
पोलिसांनी मैशेरी यांच्या तक्रार अर्जाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.
हेही वाचलंत का?