शिवसेना नेते रामदास कदम यांचा अपेक्षेप्रमाणे पत्ता कट करत सुनील शिंदे यांना मुंबई विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी हा हक्काचा मदतारसंघ सोडला होता. शिंदे यांच्यासोबत अकोला, बुलढाणा, वाशिम मतदारसागतून गोपीकिशन बजोरिया यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब हे ईडीच्या रडारवर आल्यानंतर आमदार रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप बाहेर पडली होती. ही क्लिप व्हायरल जाल्यानंतर अनेक चर्चांना ऊत आला होता. कदम यांचा पत्ता कट होणार हे निश्चित मानले जात होते. मात्र, ही उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क होते.
सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी आपला वरळी हा मतदारसंघ सोडला होता. तेव्हापासून शिंदे हे पक्षसंघटनेत होते. त्यांचे पुनर्वसन होईल असे मानले जात होते. आता विधानपरिषदेच्या जागा रिक्त झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देऊन बक्षीस देण्यात आले आहे.
शिंदे हे २००७ मध्ये सक्रीय राजकारणात आले. ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्याकडे बेस्ट समितीचे अध्यक्षपद दिले होते. २०१४ मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन ते वरळी मतदारसंघातून आमदार झाले. या निवडणुकीत त्यांना ६० हजार ६२५ मते मिळाली होती. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ त्यांना सोडवा लागला होता.
अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यााी त्यांची लढत होणार आहे.
हेही वाचा :