Mumbai Food Poisoning: नाहूरमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधा; 100 जणांना त्रास, अनेकजण रुग्णालयात, शेवटच्या पंगतीत काय घडलं?

Mumbai Wedding Food Poisoning: मुंबईतील नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय आहे.
Mumbai Wedding Food Poisoning
Mumbai Wedding Food PoisoningPudhari
Published on: 
Updated on: 

Mumbai Wedding Food Poisoning: मुंबईतील नाहूर पश्चिम परिसरात लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत तब्बल 70 ते 100 नागरिकांना उलटी आणि मळमळ यांसारखा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक अनेकांची प्रकृती बिघडल्याने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर रोजी नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात जेवणासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे, लग्नातील शेवटच्या पंगतीत जेवण केलेल्या नागरिकांना काही वेळाने त्रास जाणवू लागला. अनेकांना उलटी, मळमळ आणि अस्वस्थता जाणवू लागली.

Mumbai Wedding Food Poisoning
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मंगळवारी सात विभागांत १० तास पाणी बंद

त्रास होणाऱ्या नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, 22 जणांवर मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चार लहान मुलांना कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय पाच जणांवर विक्रोळीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai Wedding Food Poisoning
Mumbai water project: मनोरी गोडे पाणीनिर्मिती प्रकल्पाला महापालिकेचा हिरवा कंदील! २ हजार २४१ कोटींच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी

या घटनेत बाधित झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून, रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्नपदार्थांमुळे हा त्रास झाला की अन्य काही कारण आहे, याची तपासणी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे. तपासणीनंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना त्रास झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.