Mumbai Police : गटारात फेकून दिलं बाळ, मांजरांनी ओरडून नागरिकांना केलं सावध!

Mumbai Police : गटारात फेकून दिलं बाळ, मांजरांनी ओरडून नागरिकांना केलं सावध!

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गटारात पडलेल्या एका नवजात बालिकाचे प्राण वाचविले. घाटकोपरमधील रमाबाई नगर येथे एका गटारात नवजात पडले होते. याबाबत कंट्रोल रुमला फोन आला होता. त्यानंतर येथील पंतनगर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाचे प्राण वाचविले. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती ट्विट करुन दिली आहे. एक नवजात अर्भकाला कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती. या ठिकाणी जवळच रस्त्यावर काही मांजरींनी ओरडण्यास सुरुवात केली. यामुळे आजूबाजूचे नागरिक यामुळे सावध झाले. त्यांना गटारात पडलेलं चिमुकलं बाळ दिसलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतनगर पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आणि गटारात पडलेल्या बालकाला वाचविले. निर्भया पथकाने तातडीने बालकाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. आता हे बाळ सुखरुप असल्याचे मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सांगण्यात आले आहे.

बाळ गटारात पडल्यामुळे त्याच्या पोटात पाणी गेलं होतं. त्याच्या वेगवेगळ्या चाचण्यात करण्यात आल्या आहेत. ज्यांनी या मुलाला गटारात फेकून दिलं होते. त्या बाळाच्या आई-वडिलांचा अजून पत्ता लागलेला नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news