Maharashtra Politics : बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल | पुढारी

Maharashtra Politics : बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : तुझं नाव शोधून काढून तुला अपात्र ठरवू….

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत सरकारला धारेवर धऱलं आहे त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

“रा्ज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार राज्यात ६२ लाखांहून अधिक अधिकृत बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे बेरोजगारीचे हे प्रमाण शासन दरबारी नोंद केलेल्यांचं आहे. याचा अर्थ नोंदणी नसलेल्या बेरोजगारांची संख्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात तब्बल ४ लाख बेरोजगारांची नोंद आहे. अलिकडेच एका पात्र शिक्षिक उमेदवार तरूणीने शिक्षणमंत्र्यांना शिक्षक भरतीविषयी सार्वजनिकपणे प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री प्रसारमाध्यमांच्या कॅमे-यासमोर म्हणाले की, “तुझं नाव शोधून काढून तुला अपात्र ठरवू.” म्हणजे बेरोजगार तरूण-तरूणींना जाहीरपणे धमकी देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागलाय. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकणा-या त्यांच्या मुलांकडे खानावळीचं बिल भरण्यासाठीचे पैसे नाहीत; पण सरकार सुशेगात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजकीय टीका तावातावाने करतात; पण बेरोजगारीच्या मुद्यावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई या समस्या फक्त वर्तमानपत्रांच्या हेडलाईन होतायत. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर त्याचे फार वाईट परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील.”

हेही वाचा 

Back to top button